Type Here to Get Search Results !

अभ्यासा सोबतच विद्यार्थांनी खेळाची आस धरावी - खा. धनंजय महाडिक

वेध (प्रतिनिधी) दि. ०२ : अभ्यासासोबतच विविध क्रीडा प्रकार आत्मसात करणे गरजेचे आहे या माध्यमातून मुलांच शरीर मन आणि बुद्धी बळकट होण्यास मदत होईल भविष्यात विविध आव्हानांचा सामना करण्यास ते सक्षम बनतील, असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला. कळंबा साई मंदिर इथल्या सूर्यकांत हॉलमध्ये स्वराज्य महिला मंचच्या वतीन आयोजित केलेल्या खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

 कोल्हापुरातील स्वराज्य महिला मंचच्या वतीन सुर्यकांत हॉल इथं खुल्या जलद बुद्धीबळ स्पर्धेचं आयोजन केल होतं. या स्पर्धेत कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील २०० पेक्षा अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेच उद्घाटन खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते तसच क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळ पाटणकर, बँक ऑफ महाराष्ट्राच्या झोनल मॅनेजर के दुर्गा सुनीता, अभय तेंडुलकर, डॉ. नेहा तेंडुलकर, पुष्पलता मंगल, बाबासो मंगल, प्रदीप अष्टेकर यांच्या उपस्थितीत झालं. खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेच पूजन आणि दीप प्रज्वलन झालं. दरम्यान अभय तेंडुलकर यांच्या हस्ते खासदार धनंजय महाडिक, बाळ पाटणकर, के. दुर्गा सुनीता यांच्यासह मान्यवरांचा सत्कार झाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील खासदार महाडिक यांनी खास बनवून घेतलेल्या कार्यपुस्तकेचं खासदार महाडिक यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आलं. सर्व सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी खासदार महाडिक यांचे विशेष प्रयत्न असतात. कोल्हापूर जिल्ह्यातीलच नव्हे तर देशभरातील विविध घटकांचे प्रश्न संसदेत मांडून अनेकांना सहाय्य करण्याची खासदार महाडिक यांची भूमिका निश्चितच अभिमानास्पद असल्याचं इंजिनीयर अभय तेंडुलकर यांनी सांगितलं. डॉ. नेहा तेंडुलकर यांनी राबवलेले विविध उपक्रम आणि स्पर्धांची पार्श्वभूमी विषद केली. अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांनी शारीरिक तंदुरुस्तीसाठी खेळाची आवड जोपासावी मुलं ही देशाचं भवितव्य आहेत. त्यामुळ त्यांना सक्षम बनवण्याची जबाबदारी आपली आणि पालकांची असल्याच खासदार महाडिक यांनी सांगितलं. डॉ. नेहा आणि अभय तेंडुलकर यांनी सातत्यान सामाजिक उपक्रम राबवत अनेक घटकांसाठी कार्यरत राहिल्याबाबतचे गौरोवोद्गार खासदार महाडिक यांनी काढले. मुलांच्या बौद्धिक विकासासाठी बुद्धिबळ सारख्या स्पर्धांची गरज असल्याचं खासदार महाडिक यांनी सांगितलं. यानंतर खासदार महाडिक यांनी पटावर चाली खेळून या स्पर्धेला सुरवात केली. यावेळी बाबुराव पाटील, कृष्णा पाटील, मुख्याध्यापक मिलिंद कोपर्डकर, नारायण ठाकूर, साईप्रसाद बेकनाळकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments