![]() |
| शाही दसरा महोत्सवा अंतर्गत ऐतिहासिक भवानी मंडपात शिवकालीन युद्ध कलेचं प्रात्यक्षिकं सादर झाली. |
वेध प्रतिनिधी: दि. ०२ - शासनाच्या शाही दसरा महोत्सवा अंतर्गत नुकतंच शिवकालीन प्राचीन युद्ध कलेच्या प्रात्यक्षिक उपक्रमाचं आयोजन केलं होतं. ऐतिहासिक भवानी मंडपात आयोजित केलेल्या या उपक्रमात विविध संघांनी चित्त थरारक प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली.
राज्य शासनाच्या वतीन कोल्हापुरात शाही दसरा महोत्सवाचं आयोजन केलं होतं. या महोत्सवादरम्यान दररोज विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच आयोजन केलं गेलं. जिल्हा लाठीकाठी दांडपट्टा असोसिएशनच्या पुढाकारातून ऐतिहासिक भवानी मंडपात शिवकालीन प्राचीन युद्ध कलेच्या प्रात्यक्षिकांचं आयोजन केलं होतं. या उपक्रमाच उद्घाटन मंडल अधिकारी अजय नाईक, नायब तहसीलदार नितीन दापसे - पाटील, तहसीलदार तेजस्विनी पाटील यांच्या हस्ते आणि संयोजक प्रमोद पाटील, उदय गायकवाड, वस्ताद पंडित पवार, नाना सावंत यांच्या उपस्थितीत झालं. सादरीकरणापूर्वी गारद घालण्यात आली. त्यानंतर शिवकालीन शस्त्रांचं संचलन करण्यात आलं. त्यानंतर कोल्हापूर पासून पुण्यापर्यंतच्या विविध संघांनी रणवाद्य हलगीच्या तालावर चित्त थरारक प्रात्यक्षिकं सादर केली. दोन तास सुरू असलेल्या सादरीकरणादरम्यान लाठी - काठी, दांडपट्टा, तलवार फेक, फरी गदगा, लिंबू कापणं, नारळ फोडणे, विटा फेक यासह विविध शस्त्र चालवण्याच्या कलेच सादरीकरण झालं. उपस्थितांनी या शिवकालीन युद्ध कलेच्या चित्त थरारक प्रात्यक्षिकांची अनुभूती घेतली.

Post a Comment
0 Comments