वेगवेगळा आवाज (संगीत) निर्माण होणारे 'बोलके दगड'
वेध (प्रतिनिधी) दि. ०२ : राज्यभरातील १८ हजार मंदिर आणि त्यांच्या २५ हजार फोटोचा संग्रह असलेल्या कुंटे दांपत्याच्या, फोटो आणि दुर्मिळ वस्तूंच ब्राम्हण सभा करवीर मंगलधाम इथं प्रदर्शन.मोरेश्वर कुंटे आणि विजया कुंटे या दाम्पत्यान राज्यभर भ्रमंती करून १८ हजार मंदिर आणि त्यांच्यावरील २५ हजार फोटोचा संग्रह केला. त्याची लिंम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालीय. या दंपत्याचा या विषयावरील अभ्यास आणि त्यांनी संग्रहित केलेल्या दुर्मिळ वस्तूंच ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम इथ प्रदर्शन भरवण्यात आलय. त्याला प्रतिसाद लाभतोय.
- मोरेश्वर कुंटे आणि विजया कुंटे या दाम्पत्यान वानप्रस्थाश्रम स्वीकारत राज्यभरातील हजारो मंदिरांची भ्रमंती केली. एम ए टी या दुचाकीवरून या दाम्पत्यान राज्यभर प्रवास केला. या कालावधीत त्यांनी २५ हजार पेक्षाही अधिक फोटोंचा संग्रह केला. त्यांच्या या उपक्रमाची नोंद लिंम्का बुक ऑफ रेकॉर्डनं घेतली. तसंच पाण्यावर तरंगणाऱ्या विटा, विविध प्रकारच्या दगडातून उत्पन्न होणारे विविध ध्वनी, हे पाहणाऱ्यांसाठी आकर्षण ठरतं. स्वर्गिय मोरेश्वर आणि विजया कुंटे दांपत्यान जमवलेली ही अनमोल पुंजी आणि त्यांनी वेगवेगळ्या विषयावर लिहिलेली पुस्तक पुढील पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहेत त्यांचा हा वसा आणि वारसा प्रभाकर कुंटे पुढ नेत आहेत त्यांनी या सर्व उपक्रमांचे ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम इथं प्रदर्शन भरवलय मंगळवारी सायंकाळी या प्रदर्शनाच उद्घाटन डॉ. दीपक आंबर्डेकर, डॉ. वाघ, इतिहास अभ्यासक उमाकांत राणींगा, दुर्गप्रेमी अमर आडके यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झालं. दोन ऑक्टोबर पर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. त्याचा लाभ घेण्याच आवाहन प्रभाकर कुंटे यांनी केलंयं.


Post a Comment
0 Comments