वेध (प्रतिनिधी) ७ ऑक्टोबर - महात्मा बसवेश्वरांनी १२ व्या शतकात वचन साहित्याच्या माध्यमातून तत्कालीन रुढी-परंपरांवर भाष्य केलं होतं. त्या काळात सर्वधर्मीयांची संसद उभारुन प्रत्येक घटकाला न्याय देण्याची भूमिका त्यांनी घेतली होती. यावर आधारित मासिक अनुभव मंटपां अंतर्गत बसवाण्णांचे विचार, वचन पठण, अनुभाव गोष्टी आणि व्याख्यानाचं चित्रदुर्ग मठात आयोजन केलं होतं. त्याचा समाजातील शरण आणि शरणी यांनी लाभ घेतला.
कोल्हापूर लिंगायत समाजाच्या बसव केंद्राच्या वतीनं रविवार, ५ ऑक्टोबर रोजी चित्रदुर्ग मठात मासिक अनुभव मंटपां अंतर्गत महात्मा बसवेश्वरांच्या वचनांवर आधारित विचार, वचन पठण,अनुभाव गोष्टी आणि व्याख्यानादरम्यान मार्गदर्शन करताना मिणचे इथल्या आदर्श गुरुकुल शिक्षण संस्थेचे संस्थापक, प्राचार्य दत्तात्रय घुगरे......
यावेळी लिंगायत समाजातील मान्यवरांची उपस्थिती होती.
कोल्हापूर लिंगायत समाजाच्या बसव केंद्राच्या वतीनं रविवार, ५ ऑक्टोबर रोजी चित्रदुर्ग मठात मासिक अनुभव मंटपां अंतर्गत महात्मा बसवेश्वरांच्या वचनांवर आधारित विचार, वचन पठण,अनुभाव गोष्टी आणि व्याख्यानाचं आयोजन केलं होतं. राजशेखर तंबाके यांनी उपस्थितांना शिवयोग साधना दिली. या धकाधकीच्या जिवणात शिवयोग साधनेंचं महत्व त्यांनी विषद केलं. तर सुभाष महाजन यांनी अनुभाव गोष्टी अंतर्गत शिवोपासक शरण हविनहाळ कल्लैया यांचे जीवन चरित्र आणि त्यांच्या कार्या विषयी उपस्थित शरण - शरणार्थिनां माहिती दिली. यश आंबोळे यांनी महात्मा बसवेश्वरांच्या वचनांचं गायन केलं. तसचं बसवाण्णांची प्रार्थना सादर केली. शरणी संध्या व्हनगुत्ते यांनी सद्य परिस्थीतीशी सांगड घालत बसव वचनांचं पठणं आणि त्यावरील निरुपण केलं. त्या काळात वचन साहित्य पळवण्याचे प्रयत्न झाले. शरणांनी ते वाचवण्याचा प्रयत्न केला. खऱ्या अर्थान महात्मा बसवेश्वरांनीच 12 व्या शतकात त्या काळातील अनुभव मंडप म्हणजेच लोकशाहीची निर्मिती केली होती. महात्मा बसवेश्वरांना मानव जातीच्या कल्याणासाठी कार्य करायचं होतं. त्यांचं हे कार्य शरण आणि त्यानंतरच्या काळात संतांनी खऱ्या अर्थान पुढं नेल्याच मिणचे इथल्या आदर्श गुरुकुल शिक्षण संस्थेचे संस्थापक, प्राचार्य दत्तात्रय घुगरे यांनी केलं. या माध्यमातून समाजातील शरण आणि शरणार्थींना महात्मा बसवेश्वरांचं बाराव्या शतकातील कार्य, तसंच त्यांची परंपरा पुढं नेण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून सुरु असलेलं काम याविषयी माहिती देण्यात आली. शरण ऍड. अशोक देसाई आणि शरण विनायक अंबूपे या दासोहिंचा तसचं फिजिओथेरपिस्ट डाँ. अमृता कोठावळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विलास आंबोळे, सरलाताई पाटील, बाबूराव तारळी, चंद्रशेखर बटकडली, अनमोल कोठाडीया, महारुद्र पाटील, सदाशिव देवताळे, मल्लाप्पा तळेवाडीकर, ऍड. अभिषेक मिठारी, ऍड अंकिता त्रिभुवने, प्राचार्य भानुदास गाढवे यांच्यासह समाज बांधव आणि भगिनी उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments