Type Here to Get Search Results !

जैन धार्मिक पाठशाला वर्धापन

 


कोल्हापुरातील गुजरी इथल्या श्री संभावनात जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या धार्मिक पाठशालेच्या २८ व्या वर्धापन दिना निमित्य शारदा मातेच्या मुर्तीच पूजन झालं.


वेध (प्रतिनिधी) दि. ५ - कोल्हापुरातील गुजरी इथल्या श्री संभावनात जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीन धार्मिक पाठशाला चालवली जाते. या पाठशालेला यंदा २८ वर्ष पुर्ण झाली. या निमित्तानं मंदिरात धार्मिक विधींच आयोजन केलं होतं. त्याचा जैन श्वेतांबर समाजातील भाविकांनी लाभ घेतला.



  कोल्हापुरातील गुजरी इथल्या श्री संभावनात जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टद्वारे धार्मिक पाठशाला चालवली जाते. या पाठशालेचे गुरुजी अनिलभाई यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना धर्माचरणाच शिक्षण दिल जात. यासोबतच विविध खेळ, प्रश्नमंजुषा, तसच मनोरंजन या विषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली जाते. त्याचं प्रात्यक्षिक करून घेतल जातं. यंदा या पाठशाला २८ वर्षे पूर्ण झाली. या निमित्तान पाठशालेच्या वर्धापन दिन कार्यक्रमाच आयोजन केलं होतं. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलनानं झाली.  सरस्वती मातेला पुष्पमाला अर्पण करून वंदन करण्यात आल. श्रीसंघाचे उपाध्यक्ष राजेशभाई निंबजिया यांनी आपल्या मनोगतातून पाठशालेच्या सातत्यपूर्ण प्रगतीसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केल. गुरुत्री अनिलभाई यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध खेळ, प्रश्नमंजुषेचं सादरीकरण केल.  लाभार्थ्यांचे योगदान, विद्यार्थ्यांचा उत्साह, गुरुजींच समर्पण, समितीचे परिश्रम आणि पालकांच सहकार्य या संगमातून ही पाठशाला उंचीवर पोहोचली आहे. भविष्यात ही पाठशाला अधिक सक्षम बनवून धर्म आणि संस्कारांची ज्योत पुढील पिढ्यांपर्यंत नेण्याचा निर्धार या कार्यक्रमात व्यक्त झाला. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त, मान्यवर उपस्थित होते. श्री संभविनाथ जैन धार्मिक पाठशालेचा २८ वा वर्धापन दिन अत्यंत भक्तिभावान साजरा झाला.

Post a Comment

0 Comments