धुळीच्या प्रश्नावर आम आदमी पार्टीकडून महापालिकेचा निषेध, प्रवेशद्वारावर धूळ फेक आंदोलन.
वेध (प्रतिनिधी) दि.१० : शहरभर पडलेल्या खड्ड्यांमुळ हवेत धुळीचे साम्राज्य पसरलय. याचा फटका नागरिकांना बसतोय. नाका-तोंडात धूळ जाऊन नागरिक आजारी पडत आहेत. धुळीच्या त्रासान वाहनचालक नागरिकांना तोंडाला मास्क लावून फिरायची वेळ आली आहे. या प्रश्नावर महापालिकेचं लक्ष वेधण्यासाठी आम आदमी पार्टीकडून अनोखं आंदोलन करण्यात आलं. महापालिकेच्या प्रवेशद्वारावर धूळ टाकून प्रात्यक्षिक सादर करण्यात आल.
कोल्हापूर शहरात दरवर्षी रस्ते खराब होतात. पावसाळ्या हे खड्डे मुजवण्यासाठी खड्ड्यांमध्ये मुरूम टाकले जातात. पावसानं उघडीप दिल्यानंतर मुरमाचं धुळीत रूपांतर होतं. वाहून आलेली घाण माती, खड्डे आणि मुरमांमुळ प्रचंड धूळ निर्माण होते. वाहनांच्या वर्दळीमुळ ही धूळ हवेत मिसळते. त्यामुळ वाहनधारक, पादचारी, नागरिकांना या धुळीचा सामना करावा लागतो. नाका- तोंडातून माणसांच्या शरीरात गेलेल्या या धुळीमुळं अनेक आजार होतात. त्यामुळ अनेक नागरिक आजारी पडले आहेत. महापालिकेला मात्र त्याच देणे - घेणे नाही. या विषयावर महापालिका प्रशासनाला जाग आणण्यासाठी नुकतंच आम आदमी पार्टीच्या वतीन महापालिका प्रवेशद्वारावर धूळ फेक आंदोलन करण्यात आलं. रस्त्यावर धूळ फेकून ती हवेत उडवण्यात आली. हे अनोखं आंदोलन पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
केंद्राच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमातून गेल्या २ वर्षात १८ कोटी रुपये खर्च झाले. एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी खर्च करून सुद्धा शहरातील धुळीचा प्रश्न गंभीर होत आहे. चौका-चौकात लावलेले मिस्ट टॉवर बंद आहेत, हवेतील धुलिकण कमी करण्यासाठी महापालिकेने मिस्ट स्प्रेयिंग मशीन घेतले आहे, ते नेमके कुठे वापरले जाते याचे उत्तर अधिकारी देतील का असा प्रश्न आप चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी केला.
यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, सूरज सुर्वे, अभिजित कांबळे, मोईन मोकाशी,उषा वडर, विजय हेगडे, संजय नलवडे, उमेश वडर, अमरसिंह दळवी, मयुर भोसले, महमदशरीफ काझी, रवींद्र राऊत, दिलीप पाटील, रमेश कोळी, लाला बिर्जे, चेतन चौगुले, शशांक लोखंडे उपस्थित होते.



Post a Comment
0 Comments